औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक -
हाशमी चौक, टि पॉईंट येथे एक तास चक्का जाम आंदोलन.
औसा प्रतिनिधी .
औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचे आयोजित केले होते.त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटचे माजी आमदार दिनकर माने, कॉग्रेस कमिटीचे जिलाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट चे लातूर कार्याध्यक्ष रशीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 जूलै 2024 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता औसा येथील हाशमी चौक टि पॉईंट,औसा लातूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीची अशी मागणी आहे
खरीप हंगाम २०२३-२४ पिकविमा सरसकट त्वरीत देण्यात यावी.
शेतकऱ्यांची सरसकट चालु व थकबाकी कर्ज माफी करण्यात यावी.
आचारसंहिते मध्ये पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून आचारसंहितेचे उलंघन करून वाटप झालेले घरकुल रद्द करण्यात यावे.
औसा शहरातील मुख्य चौकातील उडाणपुल पिल्लरचा बांधण्यात यावा. औसा शहरातील बेघर घरकुल योजना रद्द झालेले प्रस्ताव फेरप्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावे.
संगायो-इंगायो योजनेतील वंचित व बंद झालेल्या लाभार्थ्यांना त्वरीत योजनेचे लाभ देण्यात यावे.
पी एम किसान योजनेतील अनेक पात्र व वंचित लाभार्थ्यांना योजनेचे निधी देण्यात यावे. औसा तालुक्यातील अनेक गावात घरकुल योजनेपासुन वंचित ठेवण्यात आले असल्याने त्यांना त्वरीत, घरकुलाचा लाभ देण्यात यावा.या सर्व मागणीसाठी पूर्व कल्पना देऊन सुद्धा आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आपले मत व्यक्त केले, असता या रास्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करताना शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी आंदोलनास संबोधित करताना म्हणाले की, विधानसभेच्या चालू अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला असता, मुस्लिम समाजाविषयी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला असता, याला उत्तर न देता औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या विषयावर आपले मौन बाळगुन जागेवर बसूनच उत्तर दिले नाही , याविषयी मुस्लिम समाजाच्या विषयी कसल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता, आपले मौन बाळगल्याने मुस्लिम समाजात असंतोष पसवला आहे, मुस्लिमांविषयी, मुस्लिम समाजाचा ऐवढा तिरस्कार का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. यानंतर या आंदोलनाच्या ठिकाणी तसेच अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे निवेदन स्वीकारले.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या