औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान व पिक विमा द्या व सरसगट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.
औसा प्रतिनिधी
सन २०२३-२४ चा दुष्काळी अनुदान व पिकविमा द्या व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा याबाबत औसा तालुका शेतकऱ्यांचा वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
औसा तालुक्यातील शेतकरी असून गेल्या वर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कमी पाऊस पडल्यामुळे सोयाबीन पिकावर एलोमोॉक रोगाचा प्रादुर्भाव होऊन हाती आलेले पिक नष्ट झाले. तसेच उत्पनामध्ये घट झाली व आमच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे ८० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे आपल्याकडून तालुक्यातील कांही शेतकऱ्यांना अग्रीम २५% पिकविमा वाटप करण्यात आला आहे. व बऱ्याचश्या शेतकऱ्यांना आतापर्यंत २५% पिकविमा सुध्दा भेटलेला नाही. तसेच औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता. परंतु कोणतेही दुष्काळग्रस्त अनुदान वाटप करण्यात आलेले नाही. तसेच हातचे पिक गेल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला असून तो आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना नविन कर्ज वाटप करण्यात यावे. त्यामुळे सद्या चालु असलेल्या पेरणीसाठी शेतकऱ्यास सोईचे होईल.
तरी मे. साहेबांनी औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेले अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे तसेच १००% पिकविमा वाटप करण्यात यावा व सरसकट कर्ज माफी करावी अशी मागणी औसा तालुका शेतकऱ्यांचा वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना आज दिनांक 24 जुन 2024 रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी उमर पंजेशा, शेख मेहराज, फहाद अरब,डी एन . रेड्डी,मुईद पटेल,सरवर सरदार, महंमद युनुस चौधरी, गोपाळ, धनंजय आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या