एकंबी येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी मार्गदर्शन संपन्न.
औसा प्रतिनिधी.
आज दिनांक 17/ 5/ 2024 रोजी एकंबी इथे खरीप हंगाम पूर्व नियोजन शेतकरी बैठक ग्रामपंचायत कार्यालय एकंबी येथे संपन्न झाली सदर बैठकीमध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री इरकर एस पी यांनी सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांचे लागवड तंत्रज्ञान या विषयी माहिती दिली तसेच कृषी पर्यवेक्षक घुले एस बी यांनी शंखि गोगलगाय नियंत्रण तसेच बीबीएफ पेरणी व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड तंत्रज्ञान विषयी माहिती दिली कृषी सहाय्यक कंदले एपी यांनी सोयाबीन मध्ये पंचसूत्री पद्धतीचा अवलंब करून पेरणी करण्यासंदर्भात माहिती दिली तसेच बियाणे उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया माती परीक्षण एमआरएस फळबाग लागवड आणि महाडीबीटी वरील सर्व योजना विषयी सखोल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी एकंबी गावचे सरपंच चंद्रकांत लांडगे उपसरपंच बाळासाहेब सूर्यवंशी माजी चेअरमन बालाजी रोंगे ग्रामपंचायत सदस्य राहुल रोंगे विश्वनाथ कदम दिलीप शिंदे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या