शिंदाळावाडी येथे शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून.
औसा -(प्रतिनिधी) दि, १७
औसा तालुक्यातील शिंदाळावाडी येथील शिवारातील शेताच्या सामाईक बांधावरील माती नेण्याचे कारणावरून काल सायंकाळी ०८ ते १० जणांच्या समुहाने कत्ती, काठ्या, दगड, लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून एका शेतकऱ्याचा खून केला असून इतरांना गंभीररित्या जखमी केले आहे. या प्रकरणी प्रमुख पाच व इतरांविरूद्ध भादा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधीक माहीती असी की, औसा तालुक्यातील शिंदाळावाडी येथे काल दि. १६ में गुरुवार रोजी सायंकाळी ०७ : ३० वाजण्याच्या सुमारास शिंदाळवाडी शिवारातील शेतामध्ये असलेल्या बांधावरील माती जेसीबी व ट्रॅक्टरने नेण्याचे कारणावरून काही जणांच्या समुहाने काठ्या, लाठ्या, रॉड, कत्ती, दगड याचा मारा करून विलास व्यंकट मोरे (वय ४५) रा. शिंदाळवाडी याचा खून केला आहे तर इतर अनेकांना जखमी करण्यात आले आहे. चंद्रसेन किसन मुळे, अण्णाराव किसन मुळे, शेषेराव किसन मुळे, कमलाकर शेषेराव मुळे, परमेश्वर शेषेराव मुळे, जेसीबी चालक संतोष माने, अंगद त्र्यंबक भोसले व त्यांच्या सोबतचे इतर सर्व रा. शिंदाळवाडी यांनी या शेत शिवारामध्ये काठ्या, कत्ती, दगड याचा मारा करून विलास व्यंकट मोरे यांचा खून केला. तर याच दरम्यान इतर तिघा-चौघा जणांना जखमी करण्यात आले. या प्रकरणी रोहीत विलास मोरे याच्या फिर्यादीवरून वरील ०७ जण व इतरांच्या विरोधात भादा पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, संबंधीत पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी घटना स्थळास भेट दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणी कोणास अटक केली असल्याचे वृत्त नाही. किरकोळ कारणावरून काठ्या, रॉड, दगड, कत्तीने मारहाण करून शिंदाळवाडी शिवारात खून झाल्याने गावातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या