लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औसा शहरात पोलिसांचे पथसंचलन
औसा/प्रतिनिधी
धाराशिव आणि लातूर लोकसभा मतदार संघातील लोकसभे साठी मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी मतदान होणार असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औसा पोलीस उपविभागीय अधिकारी सूनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नियोजनामध्ये औसा शहरातील पोलिसांचे पथसंचलन काढण्यात आले. शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता पोलीस स्टेशन पासून शहरातील मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयाकडे सशस्त्र पोलिसांचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 'संचलन काढण्यात आले.
सावजनिक लोकसभेची निवडणूक शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीची उपयोजना म्हणून
औसा शहरात पथसंचलन काढून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औसा शहर व तालुक्यामध्ये पोलीस बंदोबस्त सज्ज असल्याचे दाखवून दिले.
0 टिप्पण्या