प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मध्ये महाराष्ट्र दिन साजरा*

 *प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मध्ये महाराष्ट्र दिन साजरा*



किल्लारी :- किल्लारी येथून जवळच असलेल्या येळवट येथील प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मध्ये दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम   मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर  ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी  सेंटर हेड संतोष गुंजोटे , माजी  हेड बालाजी भालेराव , माजी क्लस्टर हेड सदाशिव   साबळे  , सेंटर हेड इस्माईल तंटे  , सोलार इलेक्ट्रिशियन ट्रेनर  आदित्य ढोमने , मेसन ट्रेनर दिनेश धुळे ,वेल्डिंग ट्रेनर तुषार निदानकर  पेंटिंग ट्रेनर शिवाजी चित्ते , प्रशांत बारसे ,ईश्वर कांबळे, दत्ता जमादार , बालाजी कदिरे  यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी  मनोगत व  महाराष्ट्र गीत सादर  केले. यादरम्यान विध्यार्थ्यांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  उत्तम असे  सुरक्षित माणसाचे सादरीकरण करून महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित साखरे ,प्रास्ताविक प्रशांत नेटके व आभार प्रदर्शन कृष्णा पौळ  यांनी केले.यावेळी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या