*औसा -वानवडा-तुंगी मार्गे माळकोंडजी जाणारी बस सेवा सुरु करा-सुलेमान अफसर शेख
औसा प्रतिनिधी.
औसा
औसा-वानवडा-तुंगी मार्गे माळकोंडजी जाणारी बस सेवा सुरू करावी व तुळजापूर मोड येथे मोठे शाळा,कॉलेज असून बस न थांबत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आगरप्रमुखांना निवेदन देण्यात आले. त्याचे सविस्तर वृत्त असे औसा वानवडा - तुंगी मार्ग माळकोंडजी जाणारी बस सेवा गेली चार महिने बंद आहे.सध्या 12 वी चा निकाल लागल्यामुळे तसेच शाळा, महाविद्यालय चालू होण्यास थोळा वेड असल्याने व सध्या फॉर्मसी, आ.टी.आय. पॉलिटेक्निक,बी.एस्सी चे कॉलेज चालू असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी ये -जा करण्यास फारच अडचणीचे व गैरसोयीचे होत आहे.तसेच तुळजापूर मोड येथून जवळच मोठी शाळा , महाविद्यालय असून येथून बरेचसे विद्यार्थी आपल्या गावाना ये -जा करतात परंतु सदर ठिकाणी प्रत्येक बस थांबत नाही.सदर या बाबींवर आगरप्रमुखांनी विशेष लक्ष देऊन बस थांबण्यास मदत करावी . तरी औसा-वानवडा -तुंगी मार्ग माळकोंडजी जाणारी बस सेवा पूर्ववत चालू करावी व तुळजापूर मोड येथे प्रत्येक बस थांबवून विद्यार्थ्यांना सहकार्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांनी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ औसा विभागाचे आगार प्रमुख यांना दिनांक 24 मे 2024 रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख,रा.यु.काँ. चे अविनाश टिके,अमर रड्डे,रा.वि.तालुकाध्यक्ष गणेश माने,मुकेश तोवर,विवेक कांबळे,अमर मत्ते व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
0 टिप्पण्या