आदर्श समाज सेवक सय्यद मुजफ्फरअली हाशमअली इनामदार!
सामाजिक प्रश्नाचा गुंता वाढतं असताना सदर प्रश्न सोप्या भाषेत आणि सोडवणूक कशी करता येईल याबाबत अभ्यास करून तसेच सामाजिक प्रश्नांबाबत भविष्याचा वेध घेऊन सातत्याने वाटचाल करणे या दृष्टीने आपल्याला वाटते तेवढे सोपे नाही हा सामाजिक प्रश्ना समोर हाच आज मोठा प्रश्न असताना याकडे सामाजिक प्रश्नाच्या दृष्टीने वेगळ्या दृष्टीने पाहता येईल का प्रश्न सोडवणूक करत आहेत. योग्यपद्धतीने मांडणी करता येईलना त्यामुळे एकत्र मांडणी करून विषय शासकीय अधिकारी सन्माननीय लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समोर मांडणी करून त्याबाबत काही निष्कर्ष काढता येतील काय याविषयी सतत कार्यात मग्न म्हणून असणारे एमआयएम चे ज्येष्ठ नेते माननीय सय्यद मुजफ्फर अली हाशमअली इनामदार यांचा आज दिनांक 27 मे 2024 सोमवार रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि निमित्ताने त्यांच्या चाहत्याकडून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम म्हणजे एका समाज नेत्याप्रती त्यांच्या कार्याकृती कृतज्ञता भाव अर्थात संधी म्हणता येईल सुमारे विस वर्षाच्या काळात सामाजिक प्रश्नांना हात घालून ते सोडविण्याचे किमान इमानी इतेबारीने सतत प्रयत्न केले व करत आहेत. त्यांच्या नावातच इनामदार ही संकल्पना असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले गतकाळातील देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, इनामदार, जागीरदार यांची वतनदारी काळाच्या ओघात नष्ट झाली तरी हे भविष्याचे पावले ओळखून लोकशाही राज्यपद्धतीमध्ये यांनी वाटचाल करण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
समाजाप्रती आपण काही देणे लागतो याची कृतीशील उदाहरण म्हणजे सय्यद मुजफ्फरअली हाशम अली इनामदार होय. सामाजिक प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही भेदभाव केले
नाही दिवाळी, दसरा असो रमजान असो सर्व समाज पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा झाला पाहिजे यासाठी प्रशासानाकडे नागरी सुविधा मिळण्याबाबत आपण हक्काने मागणी केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली सणासाठी शासनाकडून आवश्यक असलेल्या शिधा सामग्री मिळायला हवी अशी मागणी वेळोवेळी केली. शासनाने ही सकारात्मक भूमिका घेऊन प्रत्येक वेळेस सहकार्य केले याबाबत त्यांचेही या निमित्ताने आभार मानावेच लागतील. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये मुस्लिम समाजाच्या झालेल्या व्यथा वेदनाबाबत तत्कालीन केंद्र सरकारने न्यायमूर्ती सुंदरलाल समितीचा अहवाल जाहीर होण्यास स्वातंत्र्याची 60 65 वर्षे जावे लागले असे असेल तर अल्पसंख्यांक प्रति आपण किती संवेदनक्ष आहोत याची प्रचिती यावी वर म्हटल्याप्रमाणे सामाजिक प्रश्नांचा गुंतागुंत वाढत असताना त्याची मांडणी सोप्या पद्धतीने करून संबंधित घटकांकडे मागणी करून त्या संदर्भात काही निष्कर्ष काढता येणे शक्य आहे. इनामदार यांनी मागील सुमारे विस वर्षात नागरी समस्या, दुष्काळात शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, जीव घेण्या कोविड काळात आपल्या परीने केलेले काम औसा शहरातील तसेच, तालुक्यातील सर्वसामान्यांना विसरता येणार नाही. औसा शहराची जीवनावश्यक गरज लक्षात घेऊन शहराला पाणीपुरवठा माकणी धरणातुन हवा यासाठी त्यांनी सातत्याने आग्रहाने मागणी केली याबाबत प्रशासनाने व लोकप्रतिनिधी ने सहकार्य केले. सामाजिक प्रश्न सोडवीत असताना इतर मान्यवर हे प्रयत्न करत असतात त्यांची ती जबाबदारी असते मात्र हा प्रश्ना बाबत सातत्य ठेवून भविष्याकडे जाण लक्ष ठेवून वेध घेऊन ठेवून त्याची सोडवणूक करणे महत्त्वाचे ठरते. असे कितीतरी असंख्य प्रश्न आहेत या ठिकाणी या सर्वांचा नमु उल्लेख करणे शक्य होणार नाही शेतकरी सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी कर्मचारी शिक्षक प्राध्यापक या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी आजपर्यंत सोडवणूक करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. प्रामुख्याने त्यांच्याकडून या प्रश्नांची सोडवणूक झाली त्याची वर्गवारी नागरी समस्या, कृषी समस्या, शिक्षण, रस्ते, पिक विमा, शेतकऱ्यांना अनुदान, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, माफी विषयक प्रश्न, प्रशासकीय प्रश्न, कोरोना काळ अशी विभागणी करता येईल वर्तमान सामाजिक प्रश्नांचा गुंता वाढवत असताना त्या सातत्या ठेवून स्वतःकडे कोणत्या प्रकारचा आर्थिक स्त्रोत नसताना सर्व समाजातील संभाव्य ठेवून समानता भाव ठेवून त्यांच्या प्रश्नाचे सोडवणूक करणे निराळेच. एमआयएम नेते सय्यद मुजफ्फरअली हाशम अली इनामदार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या खूप खूप शुभेच्छा.
विलास कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार औसा 95 52 19 72 68
0 टिप्पण्या