चलबुर्गा येथील आदर्श वस्तीमध्ये महिलांची पाण्यासाठी भटकंती
औसा प्रतिनिधी.
तालुक्यातील चलबुर्गा येथे आदर्श वस्ती आणि दलित वस्ती मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा ते एक किलोमीटर वन वन भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. चलबुर्गा, बोरगाव, ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे तसेच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाच्या नाकर्ते कोणामुळे आदर्श वस्तीतील नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता सुरू असताना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. गावाच्या आदर्श वस्ती व दलित वस्ती या नवीन वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कसलीही व्यवस्था नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना खाजगी शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून या वस्तीमध्ये कनेक्शन जोडण्याचे काम पूर्ण करून नागरिकांना नळाद्वारे पाणी देणे आवश्यक असताना आदर्श वस्ती मधील महिला व नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. पंचायत समिती आणि महसूल प्रशासनाने या बाबीची तातडीने दखल घेऊन चलबुर्गा येथील आदर्श वस्ती आणि दलित वस्ती मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
0 टिप्पण्या