लातूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत.
औसा प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी लातूर शहरात भेट दिली लातूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपाध्यक्ष संतोष भाऊ सोमवंशी ,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पप्पू भाई कुलकर्णी, शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, युवा सेनेचे दिनेश जावळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शेखर चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती उपसभापती किशोर जाधव यांनी स्वागत केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून लातूर धाराशिव आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी विजय आपलाच आहे असे सांगून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून सत्ता हस्तगत करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार आहे त्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपल्या परिश्रमाचे योगदान देणे आवश्यक आहे असे सांगितले.
0 टिप्पण्या