उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एम आय एम पक्षाचे उमेदवार इब्राहिम उर्फ गोला भाई यांची औसा येथे पदयात्रा.
औसा एम बी मणियार
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एमआयएम पक्षाचे उमेदवार इब्राहिम उर्फ गोला भाई यांनी औसा शहरातून पदयात्रा काढून मतदारांना राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या विचार बळकट करण्यासाठी एम आय एम पक्षाला मतदान करावे असे आवाहन केले.व तसेच
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एम आय एम चे उमेदवार सिद्दिक इब्राहिम उर्फ गोला भाई यांचा औसा शहरात एमआयएमच्या प्रचारासाठी एम आय एम औसा चे कार्यकर्ते एक जुटीने प्रचार फेरीत प्रचार करताना दिसत आहेत. औसा शहरातील किल्ला मैदान येथून संध्याकाळी प्रचार फेरी काढून मतदारांना येत्या 7 मे ला पतंग चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले.यावेळी प्रचार फेरीत एम आय एम चे नेते मुस्तफा खांनसाब,एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार,अफसर शेख,औसा शहराध्यक्ष कलीम भाई शेख,अजहर कुरेशी ,शेख रफीक, शेख नय्युम, इस्माईल बागवान, इरफान बागवान आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या