धाराशिव लोकसभा मतदारसंघात राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात शीत युद्ध सुरू.

 धाराशिव लोकसभा मतदारसंघात राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात शीत युद्ध सुरू.



 औसा प्रतिनिधी.


 सार्वत्रिक लोकसभा निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असताना धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर या दोघांमध्ये सोशल मीडियावर शीतयुद्ध सुरू झाले असून दोघांचे समर्थक समाज माध्यमाच्या द्वारे आपापल्या चाहत्या नेत्याच्या बाजूने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रचार केल्यागत जनतेसमोर आपल्या नेत्यांचा मोठेपणा गाजवत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली असून भारतीय जनता पार्टी अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट या महायुतीच्या माध्यमातून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेत संपूर्ण मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या व स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी व जनतेसोबत जनसंपर्क सुरू केला आहे दुसरीकडे महायुतीचा उमेदवार ठरला नसल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाकडे सोडण्यात येणार असली तरी अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नसल्यामुळे महायुतीमध्ये वातावरण थंड आहे. विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे सर्वसामान्य नागरिकाचा फोन उचलतात कोणाच्याही अडचणीला धावून जातात अशा प्रकारची मतदारसंघांमध्ये चर्चा आहे तसेच प्रवासामध्ये अनोळखी ड्रायव्हरला गाडीचा जॅक देणे महिला ला एसटी बस मध्ये जागा उपलब्ध करून देणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे तरुण कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणे, जिम मधील व्यायामाच्या फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे, सायकल चालविणे, सकाळच्या प्रहरी धावणे तसेच योगासन करणे अशा माध्यमातून शारीरिक फिटनेस व आरोग्य अबाधित राखण्याबाबत त्यांची चर्चा मतदारसंघांमध्ये आहे तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी धाव घेऊन कोट्यावधी रुपयाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले. आरोग्यसेवा गतिमान केल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या हातगाडी विक्रेत्यांना आर्थिक मदत आणि कौशल्य विकास योजना व विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून लोकांना उद्योग व्यवसायाकडे घेऊन जात स्टार्टअप करणे महिला बचत गटांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे व त्यांना लघु व कुटीर उद्योगासाठी प्रवर प्रोत्साहन देणे शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती व्यवसायाला प्रोत्साहन देणे अशा सर्वसामान्य जनतेसह शेतकरी शेतमजुरांच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत अशा प्रकारची चर्चा समाज माध्यमावर झळकत आहे. विद्यमान खासदार हे सुरुवातीला एक दोन वेळेस फोन उचलतात आणि अडचणीच्या काळात फोन केल्यानंतर त्या कार्यकर्त्याचा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकतात अशीही चर्चा सुरू असून स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमातून मोबाईल नंबर देणे तसेच महावितरण कार्यालयात प्रत्येक ठिकाणी आपला मोबाईल नंबर असल्याचे फलक लावणे या माध्यमातून त्यांनी प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारची विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहेत प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे खासदार हे जनतेच्या प्रश्नाची कोणत्याही प्रकारे सोडवणूक करीत नाहीत अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्यांचा फोन घेत नाहीत अशाही चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहेत एकूणच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्यात सोशल मीडियावर शीत युद्ध सुरू असले तरी जनता मात्र धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कोण कटिबद्ध आहे हे चांगल्या प्रकारे जाणत असल्यामुळे येणाऱ्या काळात जनता कोणाच्या पाठीशी आहे हे दिसून येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या