तीन वर्षीय सय्यद सैफुल्लाह फय्याज या लहान वयाच्या मुलाने ठेवला जीवनातील पहिला रोजा

 तीन  वर्षीय सय्यद सैफुल्लाह फय्याज या लहान वयाच्या मुलाने ठेवला जीवनातील पहिला रोजा


.


औसा प्रतिनिधी



 सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून जिकडे- तिकडे आनंदाचे व भक्तीभावाचे वातावरण दिसून येत आहे. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांना रोजे ठेवणे फर्ज (अनिवार्य) आहे. महिनाभर त्यामुळे सर्व मुस्लिम महिला पुरुष व युवक युवती इतकेच नव्हे तर लहान मुले-मुली सुद्धा स्वेच्छेने रोजे ठेवून, नमाज व कुरआन पठण करून अल्लाहची (ईश्वराची) इबादत (उपासना) करतात. यामध्ये चिमुकले सुध्दा मागे नसतात.त्यांच्यातही रोजे ठेवण्याची व अल्लाहची इबादत करण्याची चढाओढ असते. या पवित्र महिन्यात लहान मुले- मुलीही रोजा ठेवून अल्लाहकडे दुआ

 करतात. बुधवार दिनांक 3 मार्च २०२४ रोजी औसा शहरातील कटगर गल्ली येथील सय्यद सैफुल्लाह फय्याज या 3 वर्षीय चिमुकलेने पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पुर्ण केला. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर या पहिल्या रोजा प्रित्यर्थ तीचा पुष्पहार घालून सूर्यस्तानंतर त्यांची रोजा खुलाई (इफ्तार) करण्यात आली. (म्हणजे त्यांचा उपवास सोडण्यात आला.) दिवसभर रोजा ठेवून व नमाज पठण करून दुआ केली. त्यामुळे त्यांच्या परिवारात उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यावर सर्वत्र कौतूक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या