भोई गल्लीतील मारुती मंदिरात श्री.गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना.

 भोई गल्लीतील मारुती मंदिरात

श्री.गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते

श्री हनुमान मूर्तीची  प्रतिष्ठापना.


.............,...........................


औसा दि... 15,

....................

औसा येथील भोई गल्लीतील श्री हनुमान मंदिर येथे श्री. हनुमानजी

यांच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी नाथ संस्थानचे सद्गुरु व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष  श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व 

ह.भ.प. श्री. श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विधिवत पूजन व मंत्रघोषात सकाळी  करण्यात आली. 

शहरातील प्राचीन हनुमान मंदिर असणाऱ्या भुईगल्लीतील हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास शहरातील हजारो हनुमान भक्त उत्साहाने सहभागी झाले होते.

सकाळी ठीक नऊ वाजता सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे मारुती मंदिरात आगमन होताच त्यांच्या हस्ते श्री मारुतीच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनाचा विधी वे.शा.स. श्री जितुदेव महाराज जोशी यांच्या मुख्य पौरोहित्यात आणि श्री वसंत देव श्री पांडुरंग देव श्री अतुल देव या सहकारी ब्रम्हव्रंदांच्या वेदमंत्र घोषात आणि रुद्र पठणात श्री मारुतीरायांच्या प्रतिष्ठापनेची संपूर्ण विधी करण्यात आला. आणि प्रतिष्ठापना विधीची सांगता आणि या निमित्ताने करण्यात आलेल्या होमाची पूर्ण होती व महाआरती ह भ प श्री श्रीरंग महाराज औसेकर यांच्या हस्ते व यजमान भक्तांच्या सहभागात मंगलमय वातावरणात संपन्न झाली.


श्री हनुमान मूर्ती

देणारी जावई श्री देवानंद धूत

यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार

........................................

भोई गल्लीतील श्री हनुमान मंदिर हे प्राचीन असून ही मूर्ती काही ठिकाणी भंग पावल्याचे लक्षात आल्यानंतर भोई गल्लीतील सर्व हनुमान भक्त यांनी नवीन मारुतीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय आदरणीय श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे मार्गदर्शन घेऊन केला आणि त्यानुसार 15 एप्रिल ही तारीख हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनासाठी निश्चित झाली.

सौ जयश्रीताई उडगे यांचे जावई श्री देवानंद धूतजी यांनी पुनर प्रतिष्ठापना करावयाची श्री हनुमान जी ची मूर्ती देण्याचा मनोज जाहीर करून ही मूर्ती मंदिरासाठी स्वखर्चातून दिली त्याबद्दल श्री गहिनीनाथ महाराज आणि श्री श्रीरंग महाराज यांच्या शुभहस्ते श्री देवानंदजी यांचा  सपत्नीक सत्कार करण्यात आला.


मान्यवरांची उपस्थिती

.............................

श्री हनुमान मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यास भोई गल्लीतील निवासी आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री भीमाशंकरआप्पा भाऊ उटगे, श्री महिशंकर दादा उटगे, सौ. जयश्रीताई उटगे, श्री रमेशप्पा उटगे, श्री हनुमंत थोरात कारभारी,श्री. मधुकरराव थोरात, रामभाऊ कालेकर, हरिभाऊ कालेकर, लक्ष्मणराव कालेकर, श्री क्षीरसागर साहेब, श्री भारतमामा माने, सुधाकरराव थोरात,माऊली हॉटेलचे काळेकर बंधू, श्री सुरेश भुरे, श्री गुंडानाथ सूर्यवंशी, श्री अरुण आप्पा कल्याणी, श्री वीरभद्र कोपरे, अँड, श्याम कुलकर्णी,थोरात माने परिवार, आणि भोई गल्लीतील सर्व घरातील समाजातील लहान थोर वडीलधारी माता भगिनी युवक व हनुमान भक्त या प्रतिष्ठापना सोहळ्यात उस्फूर्तपणे सेवेसह सहभागी होते.


जायफळकर महाराजांचे किर्तन

..................................,......


श्री हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना व आरतीनंतर श्री ह भ प जायफळकर महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. यावेळी ह.भ.प.श्री.वैजनाथ उस्तुरे गुरुजी व औसा शहरातील नामवंत भजनी मंडळ व वारकरी समाज उपस्थित होता.


प्रतिष्ठापना प्रित्यर्थ महाप्रसाद पंगती

..............................................

भुई गल्ली हनुमान मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आयोजन समितीतर्फे महाप्रसाद भोजन व्यवस्था करण्यात आली होती औसा शहरातील हजारो हनुमान भक्तांनी मारुतीरायांच्या आजच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.

सर्व तरुण कार्यकर्ते स्वयंसेवक व हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजक पदाधिकारी यांनी प्रतिष्ठापणा आणि महाप्रसाद व्यवस्था अत्यंत सुंदर व व्यापक पद्धतीने केली होती सर्वांनी मोठ्या भू श्रद्धेतून हनुमानजींच्या या प्रतिष्ठापनात कार्यक्रमात आपल्या सेवेचा सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या