औसा शहरातील मुख्य रस्त्यावरील नालीतील गाळाचा उपसा करा.
औसा प्रतिनिधी.
औसा शहरातील लातूरवेस हनुमान मंदिरापासून अॅप्रोच रोड चौकापर्यंत असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नालीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे तसेच 13 आणि 14 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस पडल्यामुळे या रस्त्यावरील नाली मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा प्लास्टिक कॅरीबॅग तसेच गाळ अडकल्यामुळे नाल्यात तुंबून रस्त्यावर पाणी येत आहे उन्हाळ्याचे दिवस असून साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. नाली मध्ये गाळ साचल्यामुळे डासाचे प्रमाण वाढले असून या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूतील नालीतील गाळाचा उपसा करावा आणि नालीतील पाण्याला मार्ग मोकळा करावा अशी मागणी माजी नगरसेवक गोविंद जाधव यांनी मुख्याधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या