औसा तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान फळबागा आणि द्राक्ष बागांचे नुकसान.

 औसा तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान फळबागा आणि द्राक्ष बागांचे नुकसान.


 औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यामध्ये मागील आठ दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी सुद्धा विजांचा प्रचंड कडकडाट आणि ढगाचा गडगडात होत वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने राडा केला शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा तसेच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा वादळी वाऱ्यामुळे झाडला आहे तर कलिंगड, खरबूज, टमाटे, डाळिंब आधी पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उमळून पडले आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील काढून ठेवलेले हरभरा, ज्वारी इत्यादी काढा वरील ताडपत्री शेवाळे उडून गेले आहेत काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याची माहिती आली असून औसा तालुक्यातील वानवडा येथे सिमेंटचा विद्युत पोल मोटरसायकलवर पडल्याने जीवित हानी टळली वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्यामुळे दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना शेतात अनेक अडचणीचा सामना करावा लागला तर पशुपालक वर्गाची ही मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गाई, म्हशी, बैल, वासरे यांच्यासाठी केलेले गोठ्यावरील पत्रे उडाल्याचे वृत्त आले आहे तर औसा तालुक्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातून औसा तालुक्यात आलेल्या मेंढपाळ समाजांच्या मेंढ्याच्या कळपात असलेल्या शेळ्या मेंढ्या खेचर यांच्यासह मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांचीही तारांबळ उडाली आहे सुमारे दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता असल्यामुळे नागरिकांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अत्यंत त्रास सहन करण्याची वेळ आली मागील आठ दिवसापासून औसा तालुक्यामध्ये अधून मधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागांचे नुकसान झाले असून कृषी विभाग आणि महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ही शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या