राष्ट्र पुरुषांना अभिवादन करीत विराट जनसागराच्या पदयात्रेने अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
औसा प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी बार्शी नाका येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून विराट पदयात्रा काढून महायुतीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे दाखल केला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आरोग्य मंत्री तानाजी सावंत माजी मंत्री बसवराज पाटील यांच्यासह शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान व माजी आमदार यांची उपस्थिती होती राष्ट्रमाता जिजाऊ चौक धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट पदयात्रा निघाल्यानंतर पदयात्रा मार्गावरून राष्ट्रसंत गाडगे महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर लहुजी साळवे, आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून तसेच उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करून अर्चनाताई पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्याने विजयी करून मत रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले. यावेळी म्हणजे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राणा जगदीश सिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद सदस्य विक्रम काळे आणि सुजितसिंह ठाकूर, माजी खासदार रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आरपीआय आठवले गट इत्यादी घटक पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघालेल्या भव्य पदयात्रेमध्ये हजारो महिला पुरुष व तरुण कार्यकर्ते हातात अबकी बार 404 आपकी बार मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो तसेच महायुतीच्या सर्व पक्षाचे झेंडे आणि कार्यकर्त्यांनी गळ्यात गमजे व डोक्यावर टोप्या परिधान करीत माहितीचा जयजयकार करीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पदयात्रेमध्ये सहभागी झाले छत्रपती शिवाजी चौक येथे पदयात्रा आल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करीत जेसीबी च्या साह्याने या पदयात्रेवर कार्यकर्त्यांनी फुलांची मुक्तपणे उधळण केली तर क्रेनच्या सहाय्याने उपस्थित नेत्यांना हार घालून स्वागत केले. आमदार देशात पत्र दाखल केल्यानंतर आयोजित प्रचार सभेमध्ये राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील मधुकरराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी अर्चनाताई पाटील ही माझी बहीण असून माझ्या बहिणीच्या विजयासाठी मी माझ्या अंगाचा कोट करून सर्व शक्तीनिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन देत उपस्थित जनसमुदायाला महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन केले. धाराशिव येथे आयोजित विराट पदयात्रेमध्ये बार्शी, भूम, परंडा, तुळजापूर, उमरगा, औसा आणि धाराशिव विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते स्वयं प्रेरणेने पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या