पोदार इंटरनॅशनल स्कूल औसा येथे मुलांच्या उज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी पालक-शिक्षक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.

 पोदार इंटरनॅशनल स्कूल

औसा येथे मुलांच्या उज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी पालक-शिक्षक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.



औसा प्रतिनिधी 

औसा 

पोदार इंटरनॅशनल स्कूल औसा येथील नवीन शैक्षणिक संकुल इथे पहिल्या नवीन सत्राची सुरवात करण्यासाठी शाळेच्या भव्य दिव्य प्रांगणात, उस्ताहपूर्ण वातावरणात पहिला पालक शिक्षक सभा आयोजित करण्यात आली होती. नवीन इमारत, बदलते नवीन शैक्षणिक धोरण, शाळेच्या मुलांसाठीच्या उपाय योजना, अभ्यासक्रमाच्या पद्धती, परीक्षेचे स्वरूप तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबत च क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा या सर्वाविषयी पालकांना सविस्तर माहिती श्री. विशाल शहा वरिष्ठ मार्केटिंग अधिकारी, पोदार इंटरनॅशनल स्कूल यांनी दिली. या चर्चासत्रा दरम्यान ते म्हणाले, "मुलांना २१ व्या शतकांच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पारंपरिक शिक्षण पद्धतीला बाजूला सारून पोदार शिक्षण संस्था नेहमीच नावीन्यपूर्ण

पद्धतीने काम करत आली आहे, ज्याद्वारे प्रत्येक मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येतो". शाळेचे प्राचार्य श्री. अनिल साळवे ह्यांनी संस्थेच्या यशाच्या आलेखावर विस्तृत माहिती पालकांना दिली, ज्याद्वारे त्यांनी संस्थेचा इतिहास सविस्तर पद्धतीने सांगताना प्राचार्य. श्री अनिल साळवे म्हणाले, "९६ वर्षापूर्वी शेठ आनंदीलाल पोदार यांनी १९२७ मध्ये स्थापन केलेले, पोदार एज्युकेशन नेटवर्क सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणा, सचोटी आणि सेवा या पारंपरिक भारतीय मूल्यांवर केंद्रित आणि प्रेरित आहे. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आनंदीलाल पोदार ट्रस्टचे पहिले अध्यक्ष  म्हणून गोष्टीची साक्ष देतात. १९२७ पासून पोदार इंटरनॅशनल स्कूल ही नेहमीच सातत्यपूर्ण उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी, आधुनिक तंत्रज्ञानासोबत नेहमीच सज्ज असते आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना देत असते.


यामुळेच आजपर्यंत पोदार एज्युकेशन नेटवर्कचे १४४ पोदार इंटरनॅशनल स्कूल्स (संपूर्णपणे पोदार एज्युकेशन नेटवर्कद्वारे व्यवस्थापित) आणि १०९ पोदार पार्टनर शाळांचे नेटवर्क आहे, ज्याची एकत्रित वार्षिक विद्यार्थी संख्या दोन लाख तीस हजारा पेक्षा जास्त  आहे. आज पोदार शिक्षण संस्थेच्या पोदार प्रेप नावाने प्री-प्रायमरी शाळा, पोदार इंटरनॅशनल स्कूल,  या नावाखाली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, पोदार लर्न स्कूल या ब्रँड नावाखाली भागीदार शाळा, आंतरराष्ट्रीय अंडरग्रेजुएट आणि ग्रॅज्युएट पदवी देणारी महाविद्यालये यांचा समावेश आहे. परिणामी, पोदार हे आज एक विश्वासार्ह नाव आहे आणि भारतातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे आपल्या मुलांचे आणि राष्ट्राचे भविष्य घडवण्याच्या सामूहिक प्रयत्नात एक मान्यताप्राप्त संस्था आहे असे प्राचार्य श्री अनिल साळवे ह्यांनी आपल्या मार्गदर्शनाद्वारे पालकांना सांगितले.

अतिशय उस्ताहपूर्ण वातावरणात पालक शिक्षक सभा पार पडली या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे वरिष्ठ अधिकारी, माननीय जनरल मॅनेजर श्री प्रसाद पोंक्षे, प्राचार्य श्री अनिल साळवे, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी वर्ग, नव नियुक्त शिक्षक ह्यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या