केंद्र सरकारच्या विरोधात आम आदमी पार्टीचे निदर्शने.
औसा प्रतिनिधी.
लातूर.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना इडीने अटक केली आहे. त्यांचे प्रमुख नेते आमदार सत्येंद्र जैन हे गेल्या एक वर्षापासून जेलमध्ये आहेत. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या वतीने 14 एप्रिल 2024 रविवार रोजी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनसमुदायासमोर घोषणाबाजी करण्यात आली. हातात घोषणांचे फलक व संविधानाची प्रत घेतली होती. यावेळी आम आदमी पार्टीचे आश्विन नलबले, शिवलिंग गुजर, आनंदा कामगुंडा, दगडू माने, आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या