औसा येथे अपना शुज मल्टी बॅन्ड शोरुम चा भव्य उ‌द्घाटन.

 औसा येथे अपना शुज मल्टी बॅन्ड शोरुम चा भव्य उ‌द्घाटन.










औसा प्रतिनिधी एम बी मणियार 


औसा तालुका वासियांच्या सेवेत औसा शहरात नामांकित कंपनीचे शुज, चप्पल आणि सॅंडल एकमेव कंपनीचे असलेले अपना शुज मल्टी ब्रॅण्ड शोरुमचा भव्य शुभारंभ औसा येथे अपना फुटवेअर व महाराष्ट्र फुटवेअर परिवाराच्या वतीने करण्याचे आयोजित केले होते.त्या निमित्ताने आज दिनांक 22 मार्च 2024 

शुक्रवार रोजी सकाळी ११:०० वाजता कुमार स्वामी कॉलेजच्या बाजुस मेनरोड, औसा येथे अपना शुज मल्टी ब्रॅण्ड शोरुम या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन अपना फुटवेअर व महाराष्ट्र फुटवेअर परिवाराच्या वतीने 

 करण्यात आले. यावेळी  सध्या रमजान चा महिना व उपवासाचे दिवस  असल्याने  संध्याकाळी 7 वाजता निमंत्रित बांधवांना इफ्तारी चे  आयोजन करण्यात आले होते.यामध्ये टरबूज, द्राक्षे,खरबुज,गुलाब जामुन, खारा,शव,भजे, शरबत असे इफ्तारी मध्ये अल्पोहाराची सोय अपना फुटवेअर व महाराष्ट्र फुटवेअर परिवाराच्या वतीने  करण्यात आलेली होती.या उद्घाटन सोहळा प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, माजी नगराध्यक्ष सुनीलप्पा मिटकरी, ठाकरे  शिवसेना गटाचे औसा शहर प्रमुख सुरेश दादा भुरे,  संजय मिटकरी या मान्यवरांनी या उद्घाटनास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या मान्यवरांचा   सत्कार अपना फुटवेअर परिवाराच्या वतीने  करण्यात आला.यावेळी  उद्घाटन सोहळ्यात 

औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, पत्रकार एम. बी. मणियार,सामाजिक कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला, उमर पंजेशा, नियामत लोहारे,अर्शद कुरेशी,बंकट कांबळे,मुजाहेद पटेल, गनीसर, नियामत बोराटे, शब्बीर पठाण,अहेमद भाई शेख,खाजाभाई अलुरे,मैनुभाई मुल्ला,गौस मुल्ला,  बाबु करपुडे, खुनमीर हन्नुरे,दादा मन्यारी,मैनुभाई शेख,

आदि निमंत्रित बांधव या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून  शुभेच्छा दिल्या व या उद्घाटन सोहळयाची  शोभा वाढवली त्याबद्दल अपना फुटवेअर व महाराष्ट्र फुटवेअर परिवाराच्या वतीने आलेल्या निमंत्रित बांधवाचे आभार मानले.हा उद्घाटन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अपना फुटवेअर व महाराष्ट्र फुटवेअर परिवाराचे नवाज बहिरे,गौस बहिरे,महेदी बहिरे,चांद बहिरे, वसीम लोहारे, रशीद मुंगले,गुलाम बरोटे, एकबाल बरोटे महेमूद बरोटे, इरफान बरोटे, पाशु बरोटे, यांनी  परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या