काँग्रेसचे अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त 48 जणांचे उत्स्फूर्त रक्तदान.
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि औसा जनता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 1 मार्च 2024 रोजी वीर हनुमान मंदिरामध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये औसा शहर व तालुक्यातील 48 युवकांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. फ्रेंड्स क्लब औसा अमर खानापुरे मित्र मंडळ व युवक काँग्रेस यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 48 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री गोपाळ धानुरे, विजय कोचेटा, किरण पारुडकर, जयराज कसबे, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रभाकर कापसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षीच्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा करता यावा म्हणून सहकार्य केले.
0 टिप्पण्या