लातूर रेल्वेच्या प्रमुख मागण्यासाठी आम आदमी पार्टीचे आंदोलन.

 लातूर रेल्वेच्या  प्रमुख मागण्यासाठी आम आदमी पार्टीचे आंदोलन.


औसा प्रतिनिधी 

आम आदमी पार्टी लातूरच्या वतीने रेल्वेच्या विविध मागण्यासाठी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 गुरुवार रोजी  गांधी चौक लातूर येथे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये  आंदोलन करत्यांनी अशी मागणी केली आहे.त्याचे सविस्तर वृत्त असे 

 लातूररोड - अहमदपूर - लोहा मार्ग नांदेड या नविन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण काम लवकरात लवकर सुरु करावे.

 लातूररोड - जळकोट - बोधन या नविन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाला महाराष्ट्र सरकारने ५०% निधी देवून कामाला मंजूरी द्यावी.

 लातूर रेल्वे स्टेशन येथील नवीन पिटलाईन काम लवकराव लवकर सुरु करावे.

 लातूर - औसा मार्ग किल्लारी आळंद - गुलबर्गा नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण काम सुरु करावे.

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा लवकरात लवकर उदघाटन करावे लातूर भूमिपुत्राला नौकरी देण्यात यावी.अशा विविध मागण्यासाठी आम आदमी पार्टी लातूरच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.या आंदोलनात आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक आकाश मोठेराव, जिल्हा उपाध्यक्ष युवा आकाश कांबळे, शिरूर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष समाधान सोनवणे,व सदस्य आशिष कांबळे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या