समता नगर, होळकर नगर भागात विकास कामे करण्याची मागणी.
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील प्रभाग क्रमांक तीन समता नगर व होळकर नगर भागातील नागरिकांची नागरी सुविधा व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अत्यंत गैरसोय होत आहे. बस डेपोच्या पाठीमागील रस्ता प्राध्यापक कॉलनी पासून एमआयडीसी कॉर्नर पर्यंत बंद झाल्यामुळे नागरिकांना हायवे रोड कडे जाता येत नाही तसेच समता नगर व होळकर नगर भागात कुठेही खुली जागा नाही या परिसरामध्ये ग्रीन बेल्ट नसल्यामुळे नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. बुद्ध विहाराच्या बाजूस बौद्ध भन्तेजी यांना निवासस्थानासाठी खोली व शौचालय बांधकाम करावे. तसेच पोलीस क्वार्टर नजीक तलावा शेजारी असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली असून सार्वजनिक स्मशानभूमीचा परिसर विकसित करावा आणि जनतेची होणारी गैरसोय दूर करावी. अशी मागणी समता नगर होळकर नगर भागातील नागरिकांनी आमदार अभिमन्यू पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सर्वश्री उद्धव लोंढे, आर जी कांबळे, प्रकाश लांडगे, संदिपान कांबळे, सुनील जाधव, श्रीकांत गवळी, जाधव एस एम, सुरेश सूर्यवंशी, संजय कांबळे, किसन लोखंडे, शिवाजी सूर्यवंशी, सुधाकर गायकवाड, मारुती कांबळे, जी के कांबळे, एम बी कावळे, उत्तम आळसुळे, लिंबराज गायकवाड, रंगनाथ सरवदे , विष्णू गवळी, दगडू लोखंडे, एस के जोगदंड, आनंद कांबळे, मुरलीधर कावळे, प्रभाकर कांबळे, भीमराव कांबळे इत्यादींच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या