सिद्रामप्पा मिटकरी यांची संचालकपदी निवड.
औसा प्रतिनिधी
औसा येथील महंत स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ औसा ची बैठक दिनांक नऊ जानेवारी मंगळवार रोजी परमपुज्य आदरणीय गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सिद्रामप्पा शरणप्पा मिटकरी यांची कुमारस्वामी काॅलेजच्या संचालक पदी सर्व सदस्यांनी एकमताने निवड करण्यात आली.यावेळी या बैठकीत संस्थेचे सचिव गिरीश पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष बसवराजप्पा वळसंगे, सहसचिव सुभाषप्पा मुक्ता, संचालक सुर्यभान जाधव, रविंद्र महाराज, प्राध्यापक महमद हनीफ आलुरे, राजाभाऊ बिराजदार, विजय औंढे, अँडव्होकेट अरविंद कुलकर्णी, सुनीलप्पा मिटकरी,या मान्यवरांच्या उपस्थितीत परम पूज्य आदरणीय गहिनीनाथ महाराज औसेकर व सचिव गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते सिद्रामप्पा मिटकरी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्र परिवारामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या