मारुती महाराज कारखान्यातील कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रशासन व ठेकेदारावर गुन्हा दाखल करा. संभाजी सेनेची मागणी
औसा प्रतिनिधी.
बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या ढिसाळ कारभारामुळे कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कारखाना प्रशासन आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी राज भीमा कांबळे व 21 वर्षे या तरुण कामगाराचा कारखान्याच्या चुकीच्या नियोजनामुळे व त्यास प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे जाणीवपूर्वक लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. बेलकुंड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना सुद्धा सदर राज भीमा कांबळे यास प्राथमिक उपचार न करता लातूर येथे हलविण्यात आले या कामी कारखाना प्रशासन आणि ठेकेदारांनी दिरंगाई केल्यामुळे सदर व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मारुती महाराज साखर कारखान्याच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करावी व कारखाना प्रशासन आणि ठेकेदाराची चौकशी करून राज भिमा कांबळे याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या कारखाना प्रशासन आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी सेनेने केली असून तहसीलदार औसा यांना दिलेल्या निवेदनावर सर्वश्री मनोज गरड, धर्मराज पवार, विलास लंगर, अनिल कोळी, पद्माकर भोसले, मिलिंद वारकड, शुभम गिरी, कृष्ण सुरवसे, विक्रम भोसले, विलास मोठे, अक्षय गिरी, लक्ष्मण सुरवसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या