राष्ट्रीय महामार्ग क्रं. 361 च्या औसा नगर परिषद हद्दीत दोन्ही बाजुला 30 फुटाचा सर्व्हिस रोड करा. सय्यद मुजफ्फर अली इनामदार

 राष्ट्रीय महामार्ग क्रं. 361 च्या औसा नगर परिषद हद्दीत दोन्ही बाजुला 30 फुटाचा सर्व्हिस रोड करा.

सय्यद मुजफ्फर अली इनामदार



औसा प्रतिनिधी 

 औसा शहर हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रं. 361 गेलेला आहे व त्याच्याबाजुला राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी औसा शहरवासियांसाठी सर्व्हिस रोड तयार केलेला नाही व त्याची नियोजन सुध्दा केलेले नाही. त्यामुळे दररोज अपघाताचे प्रमाण वाढले कालोपते. रस्त्याच्या पूर्व बाजुस शहराची हद्दवाढ झाल्यामुळे प्रचंड वस्ती झालेली आहे. तेथील लोकांना प्रत्येक कामासाठी सदर नॅशनल हायवे वरुन ये जा करणे शिवाय दुसरा पर्याय नाही. सर्व्हिस रोड नसल्यामुळे लहान मुले, वृध्द नागरीक व सर्वच लोक हे सदर हायवेचा उपयोग करीत आहे. त्यामुळे भविष्यात जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. त्याचा पर्याय म्हणून दोन्ही बाजुस त्वरीत सर्व्हिस रोड होणे आवश्यक आहे.


तरी मा. मंत्री महोदयांनी राष्ट्रीय महामार्ग 361 वर औसा लातूर रोड ते औसा तुळजापूर रोड औसा नगर परिषद हद्दीपर्यंत दोन्ही बाजुने 30 फुटाचा सव्हिस रोड करण्यात यावा व  यापूर्वी आम्ही नागरसोगा रोड ते सेलु रस्त्यापर्यंत पिल्लरचे पुल बांधण्यात यावे म्हणून दोन वेळेस मागणी केली होती परंतु पिल्लरचे पुल न करता कसल्याही प्रकारचे उड्डाण पूल करण्यात आलेले नाही त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होत आहे व मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्यामुळे औसा शहरात येणाऱ्या लोकांना गावांमध्ये येण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शेतरस्ते आहेत त्या ठिकाणी रस्ता न सोडता शेताकडे जाणारा नरसय्या रस्ता त्यानंतर लक्ष्मी रस्ता असे अनेक ठिकाणी शहरातून शेताकडे जाणा-या रस्त्यावर बॅरेगेट लावण्यात आले आहेत.त्या ठिकाणी रस्ते करुन देण्यात यावेत.अन्यथा एम आय एम च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार मार्फत रस्ते व परिवहन मंत्री यांना  निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी  या निवेदनावर हारुणखां पठाण, शेख नय्युम, शेख अलीम,मौला शेख,अजहर कुरेशी, सय्यद शहेबाज, सय्यद समीर, अरबाज सय्यद,बिसेन दादा,इलाही शेख, इस्माईल बागवान  यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या