औसा येथे पोस्ट ऑफिसच्या बांधकामाचा शुभारंभ.
औसा प्रतिनिधी
औसा शहरांमध्ये अत्यंत जुन्या काळामध्ये जिल्हा परिषद हायस्कूलच्या बाजूस केंद्र सरकारच्या टपाल कार्यालयाची इमारत पडझड झाल्याने मागील अनेक वर्षापासून औसा येथील पोस्ट ऑफिस च्या जागेची सुसज्ज तरतूद नसल्यामुळे कर्मचारी व जनतेची अत्यंत गैरसोय होत होती. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी औसा शहरांमध्ये पोस्ट ऑफिसची सुसज्ज इमारत व्हावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पोस्ट ऑफिसच्या मालकीची जागा उपलब्ध असताना सुद्धा इमारत बांधकामा अभावी कर्मचाऱ्यांना भाडेतत्त्वावर कार्यालय घेऊन अत्यंत तोकड्या जागेमध्ये कामकाज करावे लागत असल्याने कर्मचारी व जनतेची गैरसोय होत होती ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने औसा येथील सुसज्ज टपाल कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी मंजुरी दिली असून पोस्ट ऑफिसच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे बांधकाम वेगाने सुरू असून लवकरच औसा शहरासाठी सुसज्ज स्वतंत्र मालकीचे टपाल कार्यालय होणार असल्याने जनतेची गैरसोय टाळणार आहे.
0 टिप्पण्या