तेरणा नदीतील माती नेण्याच्या कारणावरुन मारहाण.
औसा प्रतिनिधी
तेरणा नदीतील माती नेण्याच्या कारणावरुन रस्त्यात अडवुन फायबरच्या काठीणे व लोखंडी पाईपने मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली या बाबत पोलिस स्टेशन भादा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की आन्सार सत्तार तांबोळी वय 38 वर्षे धंदा ट्रक ड्रायव्हर रा. आगड गल्ली येथील ठिकाणचा रहवाशी असुन मोसीन कुरेशी रा. अंनद नगर जि. उस्मानाबाद यांचे टिपर क्र. एम एच 24 एबी 8103 वर ट्रक ड्रायव्हर म्हणुन खाजगी नौकरी करुन माझे कुटुबाचे उपजीवीका भागवतो. दि. 31/12/2023 रोजी सांयकाळी 7 वाजता बेडकळ शिवारात टिपर मधील माती टाकून परत आशिव कडे येत असताना आशिव भांतगळी रोड आशिव पुलाजवळ आलो असता आरोपी आक्षय दादासाहेब कदम रा. कानेगाव, शहाजी मोरे रा. कानेगाव, व हारी जगताप रा. आशिव, शरद काकडे रा. आशिव ता. औसा यांनी आमच्या गावातील तेरणा नदीची माती घेवून जाऊन तुम्ही आमच्या गावात धंदा करायचा नाही असे म्हणुन शिवीगाळ करुन माझा टिपर क्र. एम. एच. 24 एबी 8103 हा रस्त्यात आडवुन मला आक्षय कदम यांनी फायबरच्या काठी ने माझ्या पाठीवर व पायावर मारहान केली व शरद काकडे यांनी दोन्ही पायाचा गुडग्यावर मारहण केली. व हरी जगताप व शहाजी मोरे यांनी मला टिपरच्या खाली ओढुन लाथाबुक्याने मारहाण केली व तसेच त्यांनी मला पुन्हा जर तु टिपर घेवुन इकडे आलास तर तुला जिवानीशी मारतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
अशी तक्रार पोलीस स्टेशन भादा येथे दाखल झाली आहे.
0 टिप्पण्या