लातूर पोलिस दलाच्या वतीने मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन..

 लातूर पोलिस दलाच्या वतीने मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन..



व्यसनमुक्तीसाठी हजारो धावले लातूरकर..


औसा प्रतिनिधी


लातूर येथील क्रीडा संकुल येथे  जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मॅराथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.त्या अनुषंगाने आज दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी 

लातूर जिल्हा पोलिस  अधीक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या एक धाव व्यसनमुक्तीसाठी मॅराथॉन स्पर्धेत हजारो लातूरकर आज 3 डिसेंबर रोजी पहाटे धावले.या मॅराथॉनच्या माध्यमातून निरोगी आयुष्यासाठी व्यसन मुक्तीचा संदेश नागरिकांना देण्यात आला.तरुणामध्ये वाढत असलेला व्यसनाधीन चे प्रमाण थांबविण्यासाठी त्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी मोहीम मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गुगल काफी चा लिंक पोलिस दलातून प्रसारित करण्यात आलेली होती.यामध्ये 6 हजारा पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी सहभाग नोंदवून बक्षिसे पटकावली. स्पर्धेच्या सुरुवातीला 10 किलोमीटर स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर 5 किलोमीटर व 3 किलोमीटर यांना स्पर्धेमध्ये सोडण्यात आले. मॅराथॉन स्पर्धेमध्ये 10 किलोमीटर मध्ये पुरुष गटात  छगन बोंबले हे प्रथम तर महिला गटात आश्वीनी मदन जाधव या प्रथम आल्या. 05 किलोमीटर पुरुष गटात विष्णू विठ्ठलराव लवाडे प्रथम तर महिला गटात निकीता विठ्ठल म्हात्रे या प्रथम आल्या. 0 3 किलोमीटर पुरुष गटात अक्षय शिवाजी पवार प्रथम तर महिला गटात प्राणवी मारुती येलाले प्रथम.  मॅराथॉन स्पर्धेमध्ये 10 किलोमीटर मध्ये प्रथम विजयी झालेल्यांना  10 हजार रोख आणि मेडल व तसेच 5  किलोमीटर व 3  किलोमीटर मध्ये प्रथम विजयी झालेल्यांना 5 हजार रुपये व 3 हजार रुपये जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे  यांच्या हस्ते  देऊन गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या