बाबरी मस्जिद पाडल्या बद्दल औशात निषेध व्यक्त

 बाबरी मस्जिद पाडल्या बद्दल औशात निषेध व्यक्त



औसा प्रतिनिधी



6 डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडल्याबद्दल एम. आय. एम. व सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने काळा दिवस पाळून   निषेध व्यक्त करुन औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.

 भारतीय प्रजासत्ताक संविधान एकात्मता, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही स्विकृती केली असून या सर्वभौम राष्ट्रात सर्वच देशवासीयांना आपआपल्या धर्मी प्रमाणे आचरण करणेचा अधिकार आहे. परंतू काही समाज कंटकांनी, समाज विघाटक लोकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी भारत देशाची एकतेची प्रतीक व ऐतीहासीक वारसा असलेली बाबरी मस्जिदचा विधंवस घडून आणला व देशाच्या अस्मीतेला काळीमा फासणारे कृत्य केले आहे आज सदर दुष्यकृत्यास 31 वर्षे होत आहेत. सदर मस्जिद ही पुरातत्त्व विभागात व वक्फ मंडळामध्ये नोंदणीकृत आहे. देशाच्या अस्मितेला काळीमा फासणारे व सदरील घटने नंतर देशात जातीय दंगलीस कारणीभूत ठरलेल्या समाज कंटकांना कठोर शासन करण्यात यावे.


बाबरी मस्जिद विध्वंस केल्यानंतर संपूर्ण देशप्त जातीय दंगली घडवून आणण्यात आल्या व त्यात देशातील मुस्लीम समाजातील व्यक्तीची कत्तल करुन त्यांच्या मालमत्तेची नुकसान करण्यात आली आहे. तरी जातीय दंगलीत झालेल्या पिडीत व्यक्तींना व त्यांच्या परिवारांना मालमत्तेचे नुकसान भरपाई विनाविलंब देण्यात यावे व सदर जातीय दंगलीत सामील असलेले सर्व समाज कंठकांना कठोर शिक्षा देण्यात यावी. पुढील काळात असल्या घटना होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.यासाठी एम. आय. एम.व सर्व मुस्लीम समाजाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.यावेळी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, खाजाभाई शेख.अजहर कुरेशी, शेख नाजम, हारुणखां पठाण, इस्माईल बागवान, सय्यद शाबोद्दीन, सरफराज पठाण, शेख अलीम,तौसीफ बागवान, समीर बागवान,कैफ बागवान,इलाही पटेल, शेख फैय्याज, सिद्दीकी मुखीब आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या