मनोज जरांगे पाटील यांची औसा येथे विराट सभा.
औसा.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दि.१० डिसेंबर 2023 रोजी औसा शहरात जाहीर सभा होणार आहे. त्या निमित्ताने सभेची तयारी व नियोजन याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याअनुषंगाने दि .८ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज औसा तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या विविध भागात दौरे काढून सभांद्वारे मराठा समाजाला एकत्र करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांची सभा 10 डिसेंबर रविवार रोजी शहरातील उंबडगा रोडवरील उटगे मैदानावर दुपारी 12 वाजता आयोजित केली आहे.
10 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मनोज जरांगे पाटील हे निलंग्याहुन औसा तालुक्यातील टिंबी येथे क्रांतीसुर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधीस्थळाला जरांगे यांनी भेट देऊन त्यांना अभिवादन करून ठिक बारा वाजता किल्ला मैदान येथे येथून उटगे मैदानावर सभास्थळी पोहोचतील व तसेच औसा शहरातील चारी बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी एक किलोमीटर आधीच पार्किंग ची व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच औशाची सभा लातुर जिल्ह्यातील व औसा तालुक्यातील एक ऐतिहासिक सभा होणार असल्याने त्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.या सभेला महिलांसाठी बसण्याची व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे.या सभेला एक ते दिड लाख मराठा समाजाचे बांधव उपस्थित राहतील ,कारण औसा तालुक्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे.मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर औशात येत असलेल्या जरांगे पाटलांचे जंगी स्वागत मुस्लिम समाजाकडून करण्यात येणार असून मुस्लिम समाजाने मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी भूमिका यापूर्वीच घेतली आहे. त्याच प्रमाणे इतर समाज बांधवांकडूनही या सभेचे स्वागत करण्यात येत आहे .व तसेच या सभेच्या नियोजनासाठी 500 हुन अधिक स्वंयसेवक सज्ज झाले आहेत.अशी माहिती पत्रकार परिषदेत सकल मराठा समाज औसा तालुक्याच्या वतीने देण्यात आली.यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या