मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार

 मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार 




औसा प्रतिनिधी 


 औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेले वाढ ही शहरातल्या नागरीकासाठी खुप मोठी समस्या झाली आहे. मोकाट कुत्र्यांपासुन लहान मुलांना जिवीतास धोका निर्माण झाला आहे व रात्री उशीरा जर बाहेर पडायचे असेल तर मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड अंगावर येत आहेत व चावा घेत आहेत आणि त्यांची संख्या कमी करणे/ किंवा यांच्या वाढत्या वंशास आळा घालणे खुप गरजेचे आहे. कुत्र्यांच्या या वाढत्या संख्येने लहान मुलांना व वृध्द माणसांवर जिवीतास धोका निर्माण झाला आहे. यापुर्वी अनेकवेळा विनंती करुनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मागील दोन दिवसात मौ. आझाद चौक यांनी एका मोकाट कुत्र्यांनी लहान मुलाचा व काल मेन रोडवर दोन जनांचा चावा कुत्र्यांची घेतला आहे.


तरी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा एम.आय.एम. च्या वतीने नगर पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल ह्याची आपण नोंद घ्यावी.या मागणीसाठी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या