मुक्तेश्वर रोडवरील अतिक्रमणावर हातोडा

 मुक्तेश्वर रोडवरील अतिक्रमणावर हातोडा


 औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील बस स्थानकाच्या पश्चिम बाजूस मुक्तेश्वर रोड लगत अनेक व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले होते त्यामुळे या परिसरात वाहतुकीला अडसर निर्माण होत होता तसेच मुक्तेश्वर विद्यालय आणि शहरातील ट्युशन क्लासेस मध्ये जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनाही या अतिक्रमणामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. शालेय विद्यार्थिनी व क्लासेस मध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी महिलांच्या छेडछाडीचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असल्यामुळे मुक्तेश्वर रोड लगतचे अतिक्रमण गुरुवार दिनांक 7 डिसेंबर रोजी काढण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या सहकार्याने हे अतिक्रमण काढून हा रस्ता संपूर्णतः मोकळा करण्यात आला. शहरात जागोजागी होणारे अतिक्रमण नागरिकांची व वाहन चालकांची सातत्याने डोकेदुखी ठरत असल्याने अतिक्रमण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या