लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक एड्स दिन साजरा

 लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक एड्स दिन साजरा


लातूर 

      विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर व श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर या महाविद्यालयामध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला आहे .याप्रसंगी प्रमुख उपस्थिती विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयातील प्रिव्हेंटिव्ह अ्न्ड सोशल मेडिसीन च्या प्राध्यापिका डॉ. विमल डोळे यांच्या हस्ते रेड रिबीन क्लबचे उद्घाटन करण्यात आले तसेच एड्स या रोगाबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केले. महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त  जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटक संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे सचिव वेताळेश्वर बावगे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे व प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमानुसार मानव जातीमध्ये अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग होत आहेत याच पार्श्वभूमीवर आज जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयात एड्स निर्मूलन जनजागृती रॅली उपक्रम सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने घेण्यात आला. या रोगाबद्दल प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी विद्यार्थ्यांना एड्स होण्याचे कारणे, लक्षणे व उपाय  मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित नंदकिशोर बावगे सांस्कृतिक विभाग प्रमुख शुभम वैरागकर ,शिवानी कोळखेरे, शबनम शेख ,सुप्रिया जाधव , मनकरणा कराळे , अंबुरे आकांक्षा,अतुल कदम, चैतन्य पवार,विशाल पाटील ,ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे,सुरत तांदळे शुभम मुर्के तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या