ओबीसी कार्यकर्त्यांची औसा येथे बैठक संपन्न

 ओबीसी कार्यकर्त्यांची औसा येथे बैठक संपन्न


..


 औसा प्रतिनिधी


 आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये चर्चेला उधाण आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे  पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोर धरत आहे त्यातच ओबीसी प्रवर्गातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून औसा तालुका ओबीसी समाजाची गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह औसा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ओबीसीच्या मूळ आरक्षणाला कसलेही प्रकारचा धक्का लागू देऊ नये अशी भूमिका घेण्यात येत असून याबद्दल जनजागृती करण्यासाठी 5 जानेवारी 2024 रोजी व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची चर्चा झाली. या बैठकीस सर्वश्री शरद पेटकर, प्रा. सुधीर पोतदार, एन.जी. माळी, विशाल माळी, सुधाकर मेहत्रे, दीपक राठोड यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या