विधानसभेत भाजप विजयाचा औसा येथे जल्लोष

 विधानसभेत भाजप विजयाचा औसा येथे जल्लोष


 

औसा प्रतिनिधी

 मध्यप्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तविले होते परंतु सर्वच एक्झिट पोलचे अंदाज फोल्ड ठरवीत मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला खंबीरपणे कौल दिला आहे. देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी मतमोजणी सुरू होताच सकाळपासून संमिश्र प्रतिसाद दिसत होता. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर होते. निवडणूक निकालानंतर एक्झिट पोलचे अंदाज बाजूला सारत चार पैकी मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला असून विधानसभेच्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विचाराला घवघवीत यश आल्याबद्दल औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी जेष्ठ नेते व्यंकट नाना मोरे, कंठप्पा मुळे, शहराध्यक्ष सुनील उटगे ,ॲड. परीक्षेत पवार, राम कांबळे, धनंजय पर्सने, भीमाशंकर मिटकरी, नितीन शिंदे, विकास कटके, विशाल कांबळे, शिवरुद्र मुर्गे ,रवींद्र कुरसुळे, पवनराज राजट्टे, विवेक देशपांडे, आकाश पाटील, युवा मोर्चाचे नितीन कवठाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विजय असो असा जयघोष करीत जल्लोष साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या