मौलाना अबुल कलाम आझाद चौक येथील अतिक्रमणखाली काढण्यात आलेले दुकानदारांना सदर जागा भाडे तत्त्वावर द्या.एम आय एम ची मागणी.
औसा प्रतिनिधी
औसा नगर परिषद व तहसील कार्यालय मार्फत दि. २२/१२/२०२३ रोजी अतिक्रमण काढण्याची मोहीम अंतर्गत मौ. अबुल कलाम आझाद चौक येथील छोटे मोठे व्यापार करुन आपले उपजिविकेचा उदरनिर्वाह करणारे व्यापारांचे दुकाने सदर अतिक्रमण मोहीम अंतर्गत काढण्यात आले आहे. सदर दुकानदार हे सदरील जागेवर ५० वर्षा पासुन नगर परिषदेच्या भाडे तत्त्वावर राहत आहेत आणि सदर जागेचा वर्षानुवर्ष न.प. ला भाडे देत आहे. परंतु न.प. च्या वतीने कसलीच पूर्व सुचना न देता सदर व्यापाऱ्यांचे दुकाने JCB च्या सहाय्याने उध्वस्त केले आहे. दुकानदारांचे कुकुट पालनाचे नुकसान केले आहे. ज्यामुळे सदर व्यापाऱ्यांचे न भरुन येणारे आर्थिक नुकसान झालेले आहे.
सदरील दुकानदारांना सदर जागा भाडे तत्त्वावर द्यावी किंवा सदर दुकानदारांचे न.प. च्या इतर जागेवर पुनर्वसन करावे.अन्यथा एम आय एम औसाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे.यावेळी निवेदन देताना माजी औसा तालुकाध्यक्ष अँड गफुरुल्ला हाशमी, तालुका सचिव सय्यद जमिरोद्दीन, शहराध्यक्ष सय्यद कलीम यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या