धनगर आरक्षणासाठी 29 डिसेंबरला औसा तहसीलवर भव्य एल्गार मोर्चा

 धनगर आरक्षणासाठी 29 डिसेंबरला औसा तहसीलवर भव्य एल्गार मोर्चा





 औसा प्रतिनिधी 

भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असताना सुद्धा मागील 60 ते 65 वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे परिणामी धनगर समाजाचे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक मागासले पण कायम असून या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण तात्काळ लागू करावे या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी औसा येथील किल्ला मैदानावरून तहसील कार्यालयावर भव्य एलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. सकल धनगर समाजाच्या वतीने होणाऱ्या मोर्चासाठी जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये घोंगडी बैठका घेऊन जनजागृती केली आहे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धनगर समाजाने हजारोंच्या संख्येने पारंपारिक धनगरी ढोल वाद्य घेऊन तसेच महिला व विद्यार्थी विद्यार्थिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सर्वश्री सुधाकर लोकरे, हनुमंत कांबळे, उद्धव काळे, राम कांबळे, नितीन बंडगर, आकाश कांबळे, राजेश सलगर, महादेव कांबळे, शिवाजी कांबळे, राजाराम भुरे, प्रकाश सूर्यवंशी, विशाल काळे, दीपक कांबळे, तानाजी होळकर, अर्जुन गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या