आलमला येथे आयुष्यमान भव:
साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न
औसा प्रतिनिधी
औसा:
औसा तालुक्यातील भादा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या आलमला उपकेंद्र येथे आरोग्य मेळावा संपन्न झाला.
यावेळी औसा आमदार अभिमन्यू पवार आणि टीम हजर होते.यावेळी विविध आजारावरील उपचार करण्यासाठी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि येथील आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाची एकूण परिस्थिती पाहून औसा आमदार अभिमन्यू पवार यांनी सदरील नियुक्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत सदरील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.आणि संसर्गजन्य आजार आणि संसर्गजन्य आजार तसेच अवयव दान आदीं बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आणि या कार्यक्रमाचे व्यवस्थितपणे नियोजन केले यामुळे आरोग्य सेवेचा जास्तीत जास्त लाभार्थी आणि नागरिकांनी आरोग्य तपासणी,उपचार, निदांनचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार यांनी केले.
तसेच उपस्थित भादा प्रा. आ. केंद्र येथील वैद्यकीय अधीकारी डॉ. रुद्रायणी पाटील,डॉ. नितीन सोनटक्के, प्रमिला शिंदे आरोग्य सेविका, युनुस शेख, घोटे बी. एफ. आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या