ग्रामपंचायत कामगार सेनेचे औसा पंचायत समिती समोर काम बंद आंदोलन...
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना भारतीय कामगार सेनेची संलग्न असलेल्या या संघटनेने विविध मागण्यासाठी औसा पंचायत समिती समोर काम बंद आंदोलन करीत विविध मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना सुधारित आकृतीबंध लागू करावा, सुधारित वेतन लागू करण्यासाठीची जाचक अट रद्द करावी, नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी, कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करून भविष्यात निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयात जमा करावी. अशा विविध मागण्या साठी औसा तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने काम बंद आंदोलन करीत सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात तालुका अध्यक्ष शेख ताजोद्दीन, उपाध्यक्ष लक्ष्मण जोगदंड, सचिव दीपक पांचाळ, संघटक खंडू गायकवाड, रविकांत वेदपाठक, अमोल मोरे, नारायण अडसुळे, लखन रसाळ, गुंडू भोळे, संतोष जोगी, ब्रह्मानंद स्वामी यांच्यासह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या