दहा बाय दहा चा अतिक्रमण काढण्यासाठी मोजले 10 एकर जमीन अतिक्रमण कधी काढणार याकडे शहराचे लक्ष..

 दहा बाय दहा चा अतिक्रमण काढण्यासाठी मोजले 10 एकर जमीन

अतिक्रमण कधी काढणार याकडे शहराचे लक्ष..



औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील सर्वे नं ८८ मधून काजी गल्ली कडे जाणारा  शहर विकास आरा खडातील नियुजीत शहराचा दक्षिण भागात जोडणारा  २० फुटाच्या रस्त्यावर एका अतिक्रमण धारकाने अतिक्रमण करून चक्क रस्ता अडविला आहे . स्थानिक नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे सदरील अतिक्रमण काढण्यासाठी नियोजन अर्ज देऊन कोर्टात दात मागितले पण प्रशासनाकडून या अतिक्रमण धारकाला अभय देणयाचे काम चालू आहे. नाईलाजाने येथील नागरिकांनी उपोषण सुरू करण्याचा ईशारा दिल्यानंतर घाईगडबडीने रस्ता मोजणी साठी भुमी अभिलेख कडे मोजणी फीस भरून रस्ता मोजणीचे अर्ज दिले.

त्यानंतर घाईगडबडीने भुमिअभिलेखाने दहा बाय दहा  च्या अतिक्रमणासाठी चक्क 10 एकर जमीन मोजले त्यामुळे शहरात चर्चा आहे की  आता प्रत्येक अतिक्रमण करणाऱ्या साठी नगरपालिका प्रत्येक वेळी शासकीय मोजणी करून अतिक्रमण काढणार का? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या