राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष , कार्याध्यक्ष यांची संयुक्त बैठक..
औसा प्रतिनिधी
दिनांक 13.12.2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष/कार्याध्यक्ष यांची संयुक्त बैठक श्री व्यंकट बेद्रे प्रदेश सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये साधक बाधक चर्चा होऊन अनेक विषयावरती निर्णय घेण्यात आले व लातुर जिल्हयात पक्ष मजबुतीसाठी सांघिक प्रयत्न करण्याचे ठरले.
पारीत झालेल्या निर्णयात लातुर जिल्हा मध्ये पुढील आठवडयात तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या निवडी संदर्भात तालुका निहाय दौरा आयोजित करण्यात यावा तसेच जिल्हा व तालुका मध्ये सर्व विभाग सेल ची पदाधिकारी यांच्या नेमणुका करण्यात याव्या व या नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा मा. मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ करावा. लातूर शहरात जिल्हा मुख्यालय ठिकाणी तसेच तालुका निहाय मुख्य रस्त्यावर पक्षाचे कार्यालय उघडण्यात यावे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अजितदादा पवार यांच्या कडे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक लावण्यात यावी जेणेकरून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. राष्ट्रवादीचे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात यावा व लोकांचे ज्वलंत प्रश्न, समस्या यांचे निराकरण करण्यासंदर्भात हातभार लावता येईल. धाराशिव लोकसभा मतदारसंघ संदर्भात औसा ठिकाणी बैठक ठेवण्यात यावी व चर्चा घडविण्यात यावी असेही या बैठकीमध्ये चर्चे अंती ठरले. लातूर जिल्ह्याच्या विविध शासकीय कमीटया मध्ये पक्षाचे कार्यकर्ते नेमण्यासंदर्भात पालकमंत्री महोदय व मा अजितदादा यांची भेट घेण्यात यावी व कोट्याप्रमाणे कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी. आगामी काळामध्ये पक्ष संघटन जिल्ह्यामध्ये बळकट करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी ठिकठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जाऊन पक्ष बळकट व नवीन उत्साह निर्माण करण्यात यावा असे एक मताने ठरले. या बैठकीस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अफसर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष पंडित धुमाळ, प्रदेश सरचिटणीस श्री व्य॔कट जी बेंद्रे, श्री मुर्तुझा खान,श्री बबन भोसले, श्री इब्राहिम सय्यद,श्री इरशाद सय्यद श्री प्रशांत पाटील, प्रदिप गंगणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या