स.पो.नि.बाळासाहेब डोंगरे यांनी दिली गुळखेडा येथील बेमुदत साखळी उपोषणांस भेट

 स.पो.नि.बाळासाहेब डोंगरे यांनी दिली गुळखेडा येथील बेमुदत साखळी उपोषणांस भेट 



गुळखेडकर उपोषणावर साखळी उपोषण सुरू ठेवण्यावर ठाम


औसा प्रतिनीधी


मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी औसा तालुक्यातील गुळखेडा,रिंगणी,गुळखेडा या गावाच्या वतीने गुळखेडा येथील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू असून चौथ्या दिवसी भादा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी साखळी उपोषण स्थळी भेट दिली. व प्रशासनाच्या वतीने उपोषण मागे घेण्याची विनंती  समस्त उपोषण कर्ते यांना केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की भादा पोलिस स्टेशन अंतर्गत हद्दीत कुठेही उपोषण सुरु नाही तरी समस्त गुळखेडकरांनी चालू असलेले मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषण तुर्तास मागे घ्यावे. शासन स्तरांवर आरक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे तपासणी सुरु असुनही आम्ही पण आमच्या पोलिस स्टेशन मधील सर्व कागदपत्रे तपासून तारखीसहित कागदपत्रांची झेरॉक्स काढून शासन दरबारी पाठवत आहोत.मोठ्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी शासन कायमस्वरूपी  टिकणारे आरक्षण देणार आहे. परंतु गुळखेडा,वाडी रिंगणी येथील समस्त मराठा बांधवांनी आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करत असून जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण करणार असून सरकारने 2 जानेवारी पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगितले आहे. यापुर्वी पण शासनाने मराठा समाजाला आश्वासन दिले होते परंतु आरक्षण दिले नाही. त्यामुळे ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्याच दिवशी आम्ही समस्त गुळखेडा,वाडी रिंगणी गावात फटाके वाजवून दिवाळी साजरी करणार असून तोपर्यंत या तिन्ही गावात दिवाळी साजरी करणार नसल्यांचे या प्रसंगी एकमुखाने सांगण्यात आले.  गुळखेडांचे जेष्ठ नागरिक उत्तम भोसले,शेषेराव गोरे,अरविंद भोसले,ग्रामपंचायत सदस्य सुधीर भोसले,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर बेले,पोलिस पाटील इसाक पटेल,भास्कर भोसले,दिलीप भोसले,पृथ्वीराज गोरे,हसंराज भोसले,ज्ञानदेव भोसले,प्रशांत यादव,महेश रोंगे, अतुल भोसले,नानासाहेब रोंगे,हर्षद भोसले,प्रविण भोसले,वैभव भोसले , अमोल शिंदे,सचिन भोसले,सागर भोसले,अक्षय भोसले,गोपाळ शिंदे,सतिष भोसले, यांच्यासह  साखळी उपोषण स्थळी शेकडो सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या