किल्लारी ग्रामपंचायत चे मतदान शांततेत ६५/ टक्के मतदान

 किल्लारी ग्रामपंचायत चे मतदान शांततेत

६५/ टक्के मतदान


कोणत्या रणरागिणी च्या गळ्यात विजयाची माळ घालणार याकडे किल्लारी करांचे लक्ष.

औसा प्रतिनिधी 

किल्लारी-- औसा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक मतदान शांततेत पार पडले.

एक सरपंच व 17 सदस्याची निवडनुक होती ६५/ टक्के मतदान झाले असुन मतदान करण्यासाठी जनतेत उत्सुकता दिसुन आली नाही. सध्या सोयाबीन रासी इतर शेताची कामे चालु आसल्याने शेतकरी, मजुर वर्ग मतदानाला महत्व न देता आपआपली कामे करण्यास प्राधान्य दिले आहे.

 कोट्यावदी चा निधी वर्षा ला येणार्‍या तिजोरीची चावी घेण्यासाठी उमेदवारानी सर्व प्रकारचा प्रयत्न झाला आहे.

सरपंचपद ओपन महीला साठी असून एका सरपंच पदासाठी एकूण चार महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.तर 17 सदस्यासाठी 52 उमेद्वारानी आपले नशिब आजमावले आहे.

मतदानाला गर्दी न होता

 सुरळीत होण्यासाठी एकूण 6 ठिकाणी 16 बुथवर मतदान घेण्यात आले.

6 वार्डामध्ये किल्लारी कारखाना जि.प शाळा दोन बुथ, किल्लारी भाग दोन जि.प. शाळा मध्ये एक बुथ, किल्लारी वाडी जि.प.शाळा तिन बुथ, जि.प.कन्या शाळा दोन बुथ, महिला केन्द्र तीन बुथ, महाराष्ट्र विद्यालय दोन बुथ, शिवाजी विद्यालय येथे तीन अशा 7 ठिकाणी 16  बुथवर १२००० मतदारापैकी ७१९६ मतदारानी हक्क बजावला.

.यामध्ये वार्ड क्रं 1 मध्ये,११९३, वार्ड क्रं 2  मध्ये १५९७,वार्ड क्रं 3 मध्ये ७९२, वार्ड क्रं 4 मध्ये १५९२ तर वार्ड क्रं 5  मध्ये ८२३, वार्ड क्रं 6 मध्ये १२६७ इतके मतदान झाले असून एकूण १२३९७ मतदारापैकी ७१९६ इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.एकूण सरासरी ६५ टक्के मतदान झाले.

सपोनी केदार यानी अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन 6 वार्डात 6 पथके करून दोनदिवस रात्रन दिवस चोख बंदोबस्त ठेवला होता.  6 नोव्हेंबर 2023  सोमवार रोजी मतमोजणी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या