मराठा आरक्षणाला पत्रकार संघाचा पाठिंबा

 मराठा आरक्षणाला पत्रकार संघाचा पाठिंबा 


औसा प्रतिनिधी

 सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत  उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर साखळी उपोषण रास्ता रोको, महाराष्ट्र बंद अशा माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आह औसा तहसिल कार्यालयासमोर औसा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून या उपोषणाला औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे व रिंगण लाईव्ह चे राजू पाटील यांनी मराठा समाजाची मागणी रास्त असून मराठा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मागणी होत असलेल्या साखळी उपोषणाची वर्तमानपत्रातील बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी करून सहकार्य केले आहेत. तरीपण औसा तालुक्यातील सर्व पत्रकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना व्यक्त केली. बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू असलेल्या उपोषणास मातोळा ग्रामपंचायतीने गाव बंदीचा ठराव घेऊन आंदोलन उपोषण  करण्याचे सादर केला तर औसा ऑटो युनियन च्या माध्यमातून या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यात आला औसा शहरातील असंख्य ऑटो रिक्षा चालकांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला. सर्व श्री रमेश दूरकर, विजयकुमार बोरफळे, सुधीर गंगणे, राम कांबळे, एस.ए. काजी, इलियास  चौधरी, मुक्तार मनियार, महबूब बक्षी, प्रकाश कुलकर्णी, विवेक मिश्रा, विनायक मोरे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या