जय भवानी प्रतिष्ठान चे मंदिर उभारणीचे कार्य प्रेरणादायी ऍड मुक्तेश्वर वाघदरे

 जय भवानी प्रतिष्ठान चे मंदिर उभारणीचे कार्य प्रेरणादायी ऍड मुक्तेश्वर वाघदरे


 औसा प्रतिनिधी

 जय भवानी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गावातील देणगीदारांच्या सरळ हाताने केलेल्या मदतीतून आणि लेखमातांनी कलशारोहण सोहळ्यासाठी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून उजेड येथे तुळजाभवानी मातेचे मंदिर उभारणीचे काम अतिशय फक्त गणासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन श्री मुक्तेश्वर देवालय न्यास औसाचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वाघमारे यांनी केले. दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सर्वश्री धनंजय कोपरे, बाबुराव शिंदे, दादा कोपरे, आत्माराम मिरकले, संभाजी शिंदे, राम कांबळे, उमाशंकर मोरगे, प्रकाश डोंगे, धनंजय कठारे, सदाशिवराव तिडके, प्रकाश वाघमारे, जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्यंकट डांगे, दयानंद चिमण शेट्टी, जगन्नाथ गंगणे, भास्कर जाधव, भाऊसाहेब सगर, राजकुमार पोचापुरे, भानदास काळे, रमेश सगर, भानुदास हजारे, लहू सुरवसे, अंबादास घोलप यांच्यासह जय भवानी प्रतिष्ठान व तुळजाभवानी माता मंदिर बांधकाम समितीचे पदाधिकारी देवीभक्त आराधी मंडळ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शार्दीय नवरात्र महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात बोलताना पुढे ऍड वागदरी म्हणाले की औश्यातील दादा कोपरे आणि त्यांच्या परिवाराला सामाजिक कार्याचा वारसा लाभले असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातून या मंदिराची उभारणी करण्यासाठी ग्रामस्थांना प्रेरणा मिळाली. कोणत्याही मंदिराचे काम पूर्णत्वास येण्यासाठी देवावरची आढळ श्रद्धा आणि निष्ठा भक्ती महत्त्वाचे असते निष्ठा आणि भक्ती असल्यास मंदिर उभारणीचे काम पूर्ण होण्यासाठी ईश्वरी शक्ती चा आशीर्वाद भक्तांना आपोआप मिळतो असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. जय भवानी प्रतिष्ठान व श्री शिवशक्ती तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने औसा येथून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेवटी महाआरती व महाप्रसाधने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली नवरात्र महोत्सवाच्या समारोप प्रसंगी शेकडो ग्रामस्थ महिला व देवीभक्त उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या