मातोळा येथे मराठा आरक्षण साठी आंदोलकांचा ऊस्फूर्त प्रतिसाद .
.
औसा प्रतिनिधी
मनोज रंगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करा असे आवाहन केले आणि सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र यावे म्हणून साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले आहे. या आव्हानास प्रतिसाद देऊन मातोळा तालुका औसा येथील मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू झाले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी या आंदोलनास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत साखळी उपोषणास सहभाग नोंदविला. संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्याम भोसले यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सर्वश्री अण्णासाहेब भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भोसले, संतोष आनंदगावकर ,गोविंद भोसले, दत्तात्रय आनंदगावकर, रमेश भोसले, विजय भोसले, नेताजी जगताप, मेघराज दारफळकर, व्यंकट भोसले, अशोक गोरे च्या सहगावातील ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते साखळी उपोषणात सहभागी होत आहेत.
0 टिप्पण्या