विजयादशमी निमित्त औसा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

 विजयादशमी निमित्त औसा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन 


औसा प्रतिनिधी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीचा उत्सव अत्यंत हर्ष उल्हास मध्ये साजरा केला जातो औसा येथील मुक्तेश्वर रोड लगत असलेल्या मधुस्मृती या संघ कार्यालयासमोर शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीमध्ये शस्त्रपूजन आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उत्सव प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रार्थना व पद्य गायनाने संघ कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी गणवेश परिधान करून पारंपारिक घोषणा निनादामध्ये औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. औसा शहरातून पथसंचलन जात असताना शहरातील नागरिकांनी व महिला भगिनींनी पुष्पवृष्टी करून संघ कार्यकर्त्यांचे स्वागत केले महिलांनी जागोजागी रांगोळ्या घालून राष्ट्रीय शहर संघाच्या पथसंचलनचे स्वागत केले होते. औसा शहरासह तालुक्यातील शेकडो सेवकांनी विजयादशमीच्या उत्सवामध्ये व शस्त्र पूजन कार्यक्रमासह पथसंचलन मध्ये सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या