*पवईतील हॉटेल टुरिस्ट कडून रिपाईचे डॉ.माकणीकर यांच्या जीवितास धोका (?)*
*(मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे तक्रार)*
*मुंबई दि (प्रतिनिधी) पवईतील हॉटेल टुरिस्ट बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग सहाय्यक महापालिका आयुक्त यांच्याकडे रिपब्लिकन संविधान पक्षाचे मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केल्यानंतर त्यांना या हॉटेलच्या मालकाकडून जीवितास धोका असल्याची संभावना व्यक्त केली आहे. त्यांनी याप्रकरणी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.*
विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी ही मागणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पवईतील वीहार लेक गेट पवई येथील टुरिस्ट हॉटेलवर 43 खोल्या असून त्यापैकी 14 खोल्या या बेकायदा बांधण्यात आलेले आहेत, तसेच या ठिकाणी एक स्टुडिओ ही उभारण्यात आला आहे, त्यालाही महापालिकेची मान्यता घेण्यात आलेली नाही, या बेकायदा बांधकामाची माहिती डॉ. माकणीकर यांनी महापालिकेला दिल्यानंतर या प्रकरणात काही पालिका अधिकारी आणि पोलीस यंत्रणेतील काही अधिकारी या बेकायदा बांधकामाच्या कारवाईबाबत चालढकल करीत असल्याचा गंभीर आरोप डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.
या कारवाईबाबत हॉटेलचे मालक के अशोक राय यांचीही चौकशी करून संबंधित प्रकरणात अडकलेल्या पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची नावे उघड करावीत आणि त्यांच्यावर कडक कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
लवकरात लवकर कारवाई नाही झाल्यास मा. राज्यपाल कार्यल्यासमोर आमरण उपोषन करनार असल्याचे डॉ. माकणीकर यांनी पत्रकारांशी बोकताना सांगितले आहे.
0 टिप्पण्या