आरक्षणासाठी लामजना येथे कडकडीत बंद. आंदोलन शांततेत करण्याचे संजय लोंढे यांचे आवाहन.

 आरक्षणासाठी लामजना येथे कडकडीत बंद. आंदोलन शांततेत करण्याचे संजय लोंढे यांचे आवाहन.



 औसा प्रतिनिधी

 मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर साखळी उपोषण सुरू असून औसा तालुक्यातील लामजना पाटील येथे लामजना व परिसरातील युवकांनी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टेज उभारून साखळी उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लामजना येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून उपोषणकर्त्या युवकांनी आंदोलन शांततेत करावे व आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या सारखे विचार मनात न आणता लोकशाही मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शांततेत आंदोलन करावे असे आवाहन संजय सुग्रीव लोंढे यांनी याप्रसंगी बोलताना केले. यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राधाकृष्ण जाधव यांच्यासह तांबरवाडी राजेवाडी जावळी परिसरातील युवक मोठ्या संख्येने साखळी उपोषणात सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या